करणी सेना भन्साळी यांच्या आईवर काढणार चित्रपट

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जानेवारी 2018

जयपुर - करणी सेनेने 'पद्मावर' बघितल्यानंतर चित्रपटाच्या विरोधात केलेली निदर्शने थांबविली असून, चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला. असे असले, तरी भन्साळींवरचा त्यांचा राग कमी झालेला नाही. त्यामुळेच आता आपण दिग्दर्शकाच्या आईवरच चित्रपट काढणाऱ असल्याची घोषणा करणी सेनेने केली आहे. तसेच या चित्रपटाचे नाव 'लीला की लीला' ठेवणार असल्याचेही करणी सेनेने म्हटले आहे. 

चित्तोडगढमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद सिंह खांगरोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सिनेमा याच वर्षी प्रदर्शित करणार असून, येत्या 15 दिवसांत सिनेमाचे कथानक लिहिण्याचे काम सुरू करण्यार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लकरच या सिनेमाचा मुहूर्तही होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. या सिनेमाचे दिग्दर्शन अरविंद व्यास करणार आहेत.

यावेळी बोलताना खांगरोट यांनी आपल्यालाही अभिव्यक्तीचा अधिकार आहे, असे म्हणत या चित्रपटाची घाषणा केली आहे.

Web Title: After "Padmaavat", Karni Sena Says Will Make Movie On Director's Mother