पार्किंगची जागा असेल तरच घेता येणार गाडी

पीटीआय
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांची माहिती

केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांची माहिती

हैदराबाद : शहरांमधील वाढत्या वाहनांच्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकार नव्याने उपाययोजना आखत असून, नवीन गाड्यांच्या नोंदणीसाठी आता लवकरच ग्राहकांना पार्किंगच्या जागेचा पुरावाही द्यावा लागण्याची शक्‍यता आहे. येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली. नगरविकास मंत्रालय आणि वाहतूक मंत्रालयात याअनुषंगाने चर्चा झाल्याचे समजते. लवकरच राज्यांसोबत याअनुषंगाने सविस्तर चर्चा केली जाणार असून, विविध राज्यांना याची पूर्वकल्पनाही देण्यात आली आहे.

 
Web Title: After parking the car will be the only place