पाकिस्तानच्या कुरापती चालूच; आता सायबर वॉरला सुरवात

वृत्तसंस्था
Thursday, 23 April 2020

पाकिस्तानकडून आता सायबर वार सुरु आहे. सोशल मीडियावरुन भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारे मेसेज मोठया प्रमाणावर पसरवले जात आहेत. सोशल मीडियावरुन केल्या जाणाऱ्या या भारत विरोधी प्रचाराला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची फूस असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली :  पाकिस्तान हा नेहमीच भारताविरोधात काहीतरी कारवाया करण्यात पुढे असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाकिस्तानच्या कुरापती चालूच आहेत. पाकिस्तानकडून आता सायबर वार सुरु आहे. सोशल मीडियावरुन भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारे मेसेज मोठया प्रमाणावर पसरवले जात आहेत. सोशल मीडियावरुन केल्या जाणाऱ्या या भारत विरोधी प्रचाराला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची फूस असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या तपासात ही गोष्ट समोर आली आहे. सोशल मीडियाचा वापर करुन भारतविरोधी भावना भडकवायच्या, खासकरुन आखातीमध्ये देशांमध्ये भारताचे नाव खराब करण्याची पाकिस्तानची रणनिती आहे. यासंबंधीचा अहवाल काल (ता. २२) सरकारकडे सोपवण्यात आला आहे. सोशल मीडियावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करुन भारत आणि आखाती देशांच्या संबंधात फूट पाडण्याचा पाकिस्तानची योजना असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Coronavirus : कोणतीही चूक करु नका; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

सोशल मीडियावरुन भारताला अशा प्रकारे टार्गेट करण्याची ही पहिली वेळ नाही. मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्यापूर्वी तिथे संपर्क यंत्रणा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी सुद्धा पाकिस्तानने सोशल मीडियावरुन अशाच प्रकारे प्रचार केला होता. दरम्यान, भारत आणि आखाती देशांच्या संबंधात मोठी सुधारणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशांबरोबर संबंध सुधरवण्यावर विशेष भर दिला आहे. पाकिस्तानला या गोष्टीची सल आहे. त्यामुळे आता त्यांनी अशा प्रकारे सायबर युद्धाची सुरुवात केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After proxy war in Kashmir Pak now launches cyber war against India and PM Modi