Zomato: आरबीआयच्या घोषणेमुळे झोमॅटोचं टेन्शन वाढलं; नेमकं काय आहे प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Zomato

Zomato: आरबीआयच्या घोषणेमुळे झोमॅटोचं टेन्शन वाढलं; नेमकं काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर शुक्रवारी दोन हजाराच्या नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला. रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. मात्र, आरबीआयच्या या घोषणेमुळं झोमॅटोचं टेन्शन वाढलं आहे. (After RBI Withdraws 2000 Notes Zomato Says 72 Percent Customers Paid In Cash )

भारतीय रिझर्व्ह बँकच्या निर्देशानुसार, आजपासून म्हणजेच, मंगळवारपासून देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने धक्कादायक आकडा सादर केला आहे.

जेव्हापासून आरबीआयने देशात 2,000 च्या नोटा बाद करण्याचा आदेश जारी केला आहे. या संदर्भात बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. ज्याच्याकडे 2 हजाराची नोट आहे तो ती लवकरात लवकर खर्च करण्याचा प्रयत्न करत आहे.

याचा सर्वात मोठा पुरावा झोमॅटोने सादर केला आहे. सोमवारी, झोमॅटोने ट्विट केले की, शुक्रवारपासून (19 मे), कॅश ऑन डिलिव्हरी म्हणून प्राप्त झालेल्या सर्व फूड ऑर्डरपैकी 72 टक्के 2,000 रुपयांच्या नोटांमध्ये दिले गेले.

2000 ची नोट अशीच बदलता येणार नाही, तर...

30 एप्रिल 2023 पर्यंत 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. आता या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहे. परंतु त्या बँकेत जाऊन इतर नोटांप्रमाणे जमा केल्या जाणार नाही. त्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया तयार केली आहे. एक फॉर्म तयार केला असून तो भरावा लागणार आहे.

जर एखादी व्यक्ती त्याच्या खात्यात 2000 ची नोट जमा करत असेल तर त्याला फॉर्म भरण्याची गरज नाही. फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमचे नाव, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, मनरेगा कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतीही एक ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवावा लागणार आहे. जर समजा तुम्ही ओळख म्हणून आधार कार्ड देत असाल तर तुम्हाला त्याचा नंबर फॉर्ममध्ये लिहावा लागेल. तसेच इतर कागदपत्रे दिल्यास त्याचा क्रमांक फॉर्मवर लिहिणे आवश्यक आहे.