'सर्जिकल स्ट्राईक'नंतर मोदी म्हणाले, 'सौगंध मुझे इस मिट्टी की..!' 

Narendra Modi
Narendra Modi

चुरू (राजस्थान) : 'सौगंध मुझे इस मिट्टी की.. मैं देश नहीं मिटने दुंगा.. मै देश नही रुकने दुंगा.. मैं देश नही झुकने दुंगा..' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कविता भर सभेत ऐकवली आणि संपूर्ण सभेत 'मोदी..मोदी'चा जयघोष सुरू झाला.. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून केलेल्या दणकेबाज कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात काय बोलतात, याकडे सर्वांचेच लक्ष होते. 

राजस्थानमधील चुरू येथे भाजपची आज प्रचारसभा होती. या सभेत पंतप्रधान मोदी यांचे 'सर्जिकल स्ट्राईक 2' विषयीचे भाष्य हाच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. या कारवाईचा थेट उल्लेख न करता पंतप्रधान मोदी यांनी काही सूचक वक्तव्ये केली. 

मोदी म्हणाले, "आज एक असा दिवस आहे, की देशाच्या पराक्रमी वीरांना आपण सर्वांनी मस्तक झुकवून नमन करायला हवे. मी आज समस्त जनतेला पुन्हा एकदा आश्‍वासन देऊ इच्छितो.. की आपला देश सुरक्षित हाती आहे.. देशापेक्षा मोठे काहीच नाही.. देशापेक्षा मोठे कुणीच नाही.. कालच आपण स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर सुरक्षा दलातील त्या अनाम वीरांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक अर्पण केले.. आणि आजच्या दिवशी या वीरांना तुमचा प्रधानसेवक पुन्हा एकदा नमन करत आहे.'' या सभेमध्ये मोदी यांनी सुरवातीला 2014 मधील त्यांच्या प्रचारसभेत ऐकवलेली 'सौगंध मुझे इस मिट्टी की..' ही कविता पुन्हा ऐकविली. 

या उल्लेखानंतर मोदी यांनी त्यांच्या भाषणात राजकीय लढाईवरच लक्ष केंद्रीत केले. शेतकऱ्यांसाठीच्या सन्मान योजनेतील अंमलबजावणीवरून मोदी यांनी कॉंग्रेसशासित राजस्थानवर टीका केली. 'देशातील एक कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. पण या शेतकऱ्यांमध्ये राजस्थानमधील एकही शेतकरी नाही. कारण, अद्याप राजस्थान सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांची यादीच सादर केलेली नाही. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी ही यादी दिली आहे. पण राजस्थान सरकारने राजकारण करून ही यादीच दिलेली नाही', असा आरोप मोदी यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com