व्हॉट्सऍपवरून ट्रिपल तलाक; महिलेची न्यायालयात धाव

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

नवी दिल्ली- सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवरून पतीने 'ट्रिपल तलाक' दिल्याने महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना महिलेने म्हटले आहे की, आमचे सहा वर्षांपुर्वी विवाह झाला आहे. मुलीला जन्म दिल्यापासून पती माझ्यापासून वेगळा राहात आहे. पतीने व्हॉट्सऍपवरून 'तलाक, तलाक, तलाक' असा मजकूर टाईप करून पाठविला. पतीने घटस्पोट दिल्याचा मजकूर पाहून मला धक्काच बसला. यामुळे काय करावे समजेनासे झाले. अखेर न्याय मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

विवाह झाल्यानंतर सासरच्यांकडून छळ होत होता. अनेकदा मारहाणही होत होती. परंतु, मुलीला जन्म दिल्यानंतर छळामध्ये वाढ झाली होती. सध्या पाच वर्षांच्या मुलीसोबत वडिलांकडे राहात आहे, असेही महिलेने म्हटले आहे.

दरम्यान, व्हॉट्सऍपवरून या इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर 'ट्रिपल तलाक'साठी करणे चुकीचे आहे, असे जैमत उलेमा-आय-हिंद या मुस्लिम संघटनेचे नेते अब्दुल हमीद नौमानी यांनी म्हटले आहे.

Web Title: After 'Triple Talaq' On WhatsApp, Muslim Woman In Delhi Moves Court