'अमेरिका, इस्रायलनंतर भारत असा देश आहे, ज्याच्याशी पंगा घेण्याचं धाडस कोणीच करू शकत नाही' I Amit Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah

आम्हाला प्रत्येक देशाशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, परंतु त्याचवेळी आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही.

Amit Shah : 'अमेरिका, इस्रायलनंतर भारत असा देश आहे, ज्याच्याशी पंगा घेण्याचं धाडस कोणीच करू शकत नाही'

अमेरिका (America) आणि इस्रायलनंतर (Israel) भारत असा देश आहे, ज्याच्याशी पंगा घेण्याचं धाडस कोणी करू शकत नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अमित शाह (Amit Shah) म्हणाले, आज भारताची (India) स्थिती खूप मजबूत आहे. आज जगात कोणीही भारताच्या सीमा आणि लष्कराशी छेडछाड करू शकत नाही. अमित शाहांनी आपल्या भाषणातून शत्रू देशांना हा एकप्रकारचा इशाराच दिलाय.

2014 मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान होण्यापूर्वी भारताकडं संरक्षण धोरण नव्हतं, पण आज ते आहे, असंही शाह म्हणाले. शाह पुढं म्हणाले, 'आज भारत देश स्वातंत्र्यानंतर अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या बाबतीत सर्वात सुरक्षित आहे. कारण, आमची धोरणं स्पष्ट आहेत. आज जगात कोणीही भारताच्या सीमा आणि लष्कराशी छेडछाड करू शकत नाही. मोदीजी पंतप्रधान होण्यापूर्वी संरक्षण धोरण नव्हतं.'

अमित शाह म्हणाले, भारतावरील हल्ल्यानंतर जगाला कळलं की अमेरिका आणि इस्रायलनंतर भारत हा तिसरा देश आहे, ज्याच्याशी पंगा घेण्याचं धाडस कोणी करू शकत नाही. भारत सध्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत सर्वात सुरक्षित देश आहे. आम्हाला प्रत्येक देशाशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, परंतु त्याचवेळी आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.