esakal | भारतात कोरोनाची दुसरी लाट ते ७२ हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, ठळक बातम्या एका क्लिकवर 
sakal

बोलून बातमी शोधा

afternoon news huge increase 72330 indias covid 19 daily vaccination above 45 years started

एकवेळ भारतामध्ये कोरोना महामारी आटोक्यात आल्याचं चित्र झालं होतं. एक फेब्रुवारी २०२१ रोजी देशात ८ हजार ६३५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

भारतात कोरोनाची दुसरी लाट ते ७२ हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण, ठळक बातम्या एका क्लिकवर 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

फ्रान्समध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सरकारला पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडलं आहे. राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी बुधवारी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश दिला. तसेच याअंतर्गत शाळांना तीन आठवड्यांसाठी बंद केल्याचंही जाहीर केलं. खरंतर फ्रान्सने सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी आणि कमी वयात प्रेग्नन्सीचा धोका कमी करण्यासाठी असं पाऊल उचललं आहे. फ्रान्सच्या शाळांमध्ये अशी व्हेंडिंग मशिन्स लावण्यात आली आहेत ज्यामधून कंडोम मिळतात. फ्रान्सने घेतलेला हा निर्णय आताचा नव्हे तर जवळपास 30 वर्षांपूर्वी घेतला होता.  नंदीग्राममध्ये शुभेंदु यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नंदीग्राम विधानसभा मतदार संघातील एका बूथवर ते गेले होते. तिथून परतत असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात सुवेंदु अधिकारी किंवा त्यांच्या कारला काही नुकसान झालेलं नाही. एकवेळ भारतामध्ये कोरोना महामारी आटोक्यात आल्याचं चित्र झालं होतं. एक फेब्रुवारी २०२१ रोजी देशात ८ हजार ६३५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. ही यंदाच्या वर्षातील सर्वात कमी रुग्णवाढ होय. एक फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पसरला. गेल्या वर्षीही कोरोनामुळे परीक्षा घेता आल्या नव्हत्या. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना परीक्षाविनाच पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून ऑफलाइन शाळा बंदच आहेत. 


ग्लोबल - फ्रान्समध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सरकारला पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडलं आहे. - वाचा सविस्तर 

ग्लोबल - फ्रान्समधील 96 टक्के माध्यमिक शाळांमध्ये कंडोम व्हेंडिंग मशिन्स असल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे.. - वाचा सविस्तर 

देश - पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Election 2021) दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. यामध्ये नंदीग्राममधील हाय व्होल्टेज लढतीचाही समावेश आहे.. - वाचा सविस्तर 

देश - भारतामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. १७२ दिवसानंतर पहिल्यांदात विक्रमी ७२ हजारांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. . - वाचा सविस्तर 

 मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असतात. त्यात सचिन वाझेला अटक केल्यानंतर एनआयएनं आपल्या तपासाचा वेग आणखीन वाढवला आहे.. - वाचा सविस्तर 

मुंबई - सध्या राज्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार विरूद्ध भाजप असा संघर्ष सध्या राज्यात सुरू आहे. त्याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. . - वाचा सविस्तर 


पुणे - कोरोनामुळे जिल्हा परिषद शाळांमधील सर्व वर्गांच्या वार्षिक परीक्षा यंदाही लटकल्या आहेत. या परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. . - वाचा सविस्तर 

पुणे - वयाच्या ४५ पेक्षा जास्त वर्षाच्या सर्व नागरिकांसाठी लसीकरणाला आज (गुरुवार, ता. १) सुरवात होत आहे. दरम्यान आज पुणे शहरात 105 केंद्रावर लसीकरण सुरु करण्यात आली असून नागरिकांची गर्दी दिसत आहे. . - वाचा सविस्तर 

मनोरंजन - द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री किर्ती कुल्हारीने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. उरीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. . - वाचा सविस्तर 

मनोरंजन - विद्या फक्त ट्रॅडिशनल ड्रेस किंवा साडीच घालते असे अनेकांना वाटते. याबाबत विद्याने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.. - वाचा सविस्तर