CM उद्धव ठाकरेंची अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक ते पुण्यात कडक निर्बंध; ठळक बातम्या क्लिकवर

afternoon news maharashtra cm uddhav thackeray address state pune hotels mall lockdown night curfew time extend
afternoon news maharashtra cm uddhav thackeray address state pune hotels mall lockdown night curfew time extend

तैवानच्या पूर्व भागात रेल्वे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला, यामध्ये ३६ लोकांचा मृत्यू झाला असून ७२ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. ही दुर्घटना बोगद्यात झाली असल्याने मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यताही आपत्कालीन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. जगातील अनेक देशात कोरोना महामारी थैमान घालत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरली असून दुसरी लाट आल्याचं दिसत आहे. तर असेही देश आहेत, ज्याठिकाणी कोरोना महामारीची तिसरी लाट झाली आहे. जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. लसीकरणाला मोठा वेग आला असून राज्यात दररोज दोन लाखांवर नागरिक लस घेत आहेत. लसीकरणात टक्केवारीनुसार नागपूर जिल्ह्याने राजधानी मुंबईला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील नागरिक लसीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद देत असल्याचे आकडेवारीतून अधोरेखित झाले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्याच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आठवड्याला रुग्णांची वाढ अशीच राहिली तर पुण्यात दररोज 9 हजार नवीन रुग्ण सापडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


ग्लोबल - तैवानच्या पूर्व भागात रेल्वे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला, यामध्ये ३६ लोकांचा मृत्यू झाला असून ७२ जण जखमी झाले आहेत. -वाचा सविस्तर 

ग्लोबल - जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. कोरोना निर्बंथ शिथिल केले जात असताना जपानमध्ये चौथ्या लाटेचे आगमन झाले आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.  -वाचा सविस्तर 

देश - कोविडवरील लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवावेत किंवा नाहीत याबाबत सोशल मीडियावर मोठ्या चर्चा होत आहेत. अनेकांना हा प्रश्न सतावतही आहे. -वाचा सविस्तर 

देश - काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे कोरोना संक्रमित झाले आहेत. -वाचा सविस्तर 

 देश - जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं सुरक्षा दलाने शुक्रवारी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. -वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठा आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. परंतु राज्यातून शेतीमालाची निर्यात मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.  -वाचा सविस्तर 

महाराष्ट्र - राज्य सरकारने मार्च महिन्यात झालेल्या एकूण लसीकरणाबाबतची आकडेवारी स्पष्ट केली आहे. २०११ च्या जनगणेनुसार राज्याची लोकसंख्या पावणेबारा कोटी आहे.  -वाचा सविस्तर 

पुणे - पुणे , पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी शनिवार (ता. 3) पासून पुढील सात दिवस सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. -वाचा सविस्तर 

पुणे - पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून पुढील सात दिवसांसाठी काही सेवा पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. -वाचा सविस्तर 

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच वाजता अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक करणार आहेत. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात. -वाचा सविस्तर 

मनोरंजन - गायिका 'सावनी रविंद्र'ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'बार्डो' चित्रपटातील 'रान पेटलं' या गाण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' पुरस्कार जाहीर झाला आहे. -वाचा सविस्तर 

'मनोरंजन - रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या चित्रपटात अभिनेता आर. माधवन मुख्य भूमिका साकारत असून त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा केलं आहे. -वाचा सविस्तर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com