न्यायाधीशांच्या पदोन्नतीचा निर्णय पुन्हा पुढे ढकलला

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

नवी दिल्ली : न्यायाधीशांच्या पदोन्नतीचा निर्णय आजही कॉलेजियमने पुढे ढकलला आहे. उत्तराखंड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या नावांप्रमाणेच अन्य न्यायालयांतील न्यायाधीशांची नावे पदोन्नतीसाठी सुचविण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा आणि विचारविनिमय केला जावा असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मांडले आहे. 

सोळा मे रोजी झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीतील ठराव सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, यामध्ये उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांची नावे पदोन्नतीसाठी सुचविण्यापूर्वी त्याबाबत विचारमंथन होणे आवश्‍यक असल्याचे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या बैठकीस सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह अन्य चार ज्येष्ठ न्यायाधीशदेखील उपस्थित होते.

यामध्ये न्या. जे. चेलामेश्‍वर, न्या. रंजन गोगोई, न्या. एम. बी. लोकूर आणि न्या. कुरिअन जोसेफ यांचाही समावेश होता. तासाभरापेक्षाही अधिककाळ ही बैठक चालली. मागील पाच दिवसांतील ही दुसरी बैठक होती अशी माहिती सूत्रांनी दिली. 

न्या. जे. चेलमेश्‍वर यांचा आज शेवटचा कार्य दिवस होता. ते 22 जून रोजी निवृत्त होत आहेत. विशेष म्हणजे शनिवारपासून न्यायालयाच्या उन्हाळी सुट्यांही सुरू होत आहेत. याआधी 11 मे रोजीही कॉलेजियमची बैठक झाली होती, तेव्हाही या बैठकीमध्ये जोसेफ यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले होते. केंद्राने मात्र त्यांचे नाव याआधीच फेटाळून लावले आहे. 

Web Title: Again postponed the decision of the promotion of judges