उत्तर प्रदेशाला वादळाचा तडाखा सुरूच

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

वादळामुळे 28 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळत असून, बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वादळानी घातलेल्या कहरामध्ये सीतापूरच्या ६ जण, गोंडा येथील ३ आणि फैजाबादच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

लखनऊ : मागील काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशला बसलेल्या भीषण वादळाच्या तडाख्यात २६ जणांनी जीव गमावला होता. उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी आजूनही जिवघेणा वादळाचा तडाखा सुरूच आहे. बुधवारी (ता. 13) उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटामध्ये 10 जणांचा बळी गेला आहे.

या वादळामुळे 28 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळत असून, बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वादळानी घातलेल्या कहरामध्ये सीतापूरच्या ६ जण, गोंडा येथील ३ आणि फैजाबादच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील फैजाबाद आणि लखनऊच्या काही भागात धुळीच्या वादळाचा फटका बसण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. याचा पुर्व कल्पनाही मंगळवारी हवामान विभागाकडून देण्यात आली होती. पुढील तीन दिवस उत्तर प्रदेशासह राजधानी दिल्लीच्या भागातही धुळीचे साम्राज्य असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Web Title: again Uttar Pradesh has been hit by the storm