केजरीवाल, सिसोदिया यांच्यावर आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी मारहाण केल्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आली आहे. आरोपपत्रामध्ये दिल्लीतील 11 आमदारांच्या नावांचा देखील समावेश करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासह एकूण 13 लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी मारहाण केल्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आरोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आली आहे. आरोपपत्रामध्ये दिल्लीतील 11 आमदारांच्या नावांचा देखील समावेश करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासह एकूण 13 लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी या संदर्भात अरविंद केजरीवाल यांचे माजी सल्लागार वी. के. जैन यांनी सरकारी साक्षीदार बनवले आहे. परंतु, संदर्भात दिल्ली पोलिसांनी या आधीच अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, 19 फेब्रुवारीच्या दिवशी मुख्यमंत्री निवासमध्ये झालेल्या एका बैठकीत अंशु प्रकाश यांच्यावर हल्ला झाला होता. यामध्ये आम आदमी पक्षाचे दोन आमदार प्रकाश जरवाल, अमानतुल्लाह खान यांना अटक झाली होती, ते आता जामिनावर बाहेर आहेत.

Web Title: against Kejriwal and Sisodia filed chargesheet