मला शांततेत जगायचे आहे: अमिताभ बच्चन

पीटीआय
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

"पनामा पेपर्स' गैरव्यवहारात अमिताभ बच्चन यांचे नाव काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणी माझी प्रतिक्रिया विचारण्यात आली. मी या घटनेचा इन्कार केला आणि माझ्या नावाचा गैरवापर केला असल्याचे स्पष्ट केले. तरीही संबंधितांकडून प्रश्‍नांचा भडिमार थांबला नाही. जर काही नवे मुद्दे उपस्थित राहिले तर कायद्याचा आदर करीत आपण सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव "पनामा पेपर्स' व "बोफोर्स' गैरव्यवहारात घेतले जाते. यावर आपण नेहमीच सर्व यंत्रणांना सहकार्य करीत असल्याचा खुलासा करीत आता या वयात मला एकट्याने शांततेत जीवन जगायचे आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 

बच्चन यांनी ही रविवारी (ता.5) आपल्या ब्लॉगवरील पोस्टद्वारे आपली तगमग व्यक्त केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात सोमवारी प्रसिद्ध झालेल्या "पॅरेडाइज पेपर्स' गैरव्यवहारात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे उघड केली आहेत. त्यात अमिताभ यांचेही नाव आहे. तसेच अनधिकृत बांधकामामुळे मुंबई महानगरपालिकने त्यांना काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. याबद्दल अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. ""माझ्या उर्वरित आयुष्यात आणि या वयात मला आता शांतता हवी आहे. मला आता कोणतीही प्रसिद्धी नको आहे. मला कोणाकडूनही आभाराची अपेक्षा नाही, त्यासाठी मी पात्रही नाही, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिकेकडून अधिकृत नोटीस आपल्याला अद्याप मिळालेली नाही; पण प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तावर विश्‍वास ठेवून माझ्या वकिलाने याचे उत्तर पाठविण्यात आले आहे. 

"पनामा पेपर्स' गैरव्यवहारात अमिताभ बच्चन यांचे नाव काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणी माझी प्रतिक्रिया विचारण्यात आली. मी या घटनेचा इन्कार केला आणि माझ्या नावाचा गैरवापर केला असल्याचे स्पष्ट केले. तरीही संबंधितांकडून प्रश्‍नांचा भडिमार थांबला नाही. जर काही नवे मुद्दे उपस्थित राहिले तर कायद्याचा आदर करीत आपण सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

"काही वर्षांपूर्वी बोफोर्स गैरव्यवहारात मला व माझ्या कुटुंबाला गोवण्यात आले. तेव्हापासून अनेक वर्षे आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. देशद्रोही ठरविण्यात आले. अपमानास्पद वागणूक देण्यात आली, दुर्वतन करण्यात आले. हे सर्व सहन होण्यापलीकडे गेल्यानंतर मी जलद न्यायासाठी ब्रिटनच्या न्यायालयात धाव घेतली. आपला विजय झाला,'' असे अमिताभ म्हणाले. मात्र, आपले नाव या भ्रष्टाचारात मुद्दाम गोवले असल्याची माहिती मिळण्यात 25 वर्षे लागली,'' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: At This Age, I Seek Peace': Amitabh Bachchan On Offshore Account Allegations