आंदोलनात बीजारोपण 

Moropant-Pingale
Moropant-Pingale

श्रीरामलल्ला विराजमान यांची मंदिरात पुनः प्रतिष्ठापना हीच भारत भाग्योदयाची नांदी असणार आहे आणि या नांदीचे स्वस्तिवाचन ज्यांनी केले त्या हिंदूजागरणाच्या श्रीरामक्रांतीचा सरसेनानी असलेल्या कुशल संघटक मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभी हे घडणे हा नियतीचा शुभसंकेत म्हणावा लागेल. १९७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ३०० व्या राज्याभिषेकानिमित्त रायगडावरील भव्य कार्यक्रम, आंध्र प्रदेशातील डॉ. हेडगेवार यांचे मूळगाव कंदकुर्ती इथे सेवा प्रकल्प, मुंबईचा नारायण हरी पालकर -स्मृती समिती रुग्णसेवा-प्रकल्प, लघुउद्योग भारती व वैदिक सरस्वती नदी संशोधन या कार्यात मोरोपंतांची महत्त्वाची भूमिका होती. श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातील त्यांची भूमिका तर बीजारोपण करणारी होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गंगापूजन, भारतमातापूजन अशा रथयात्रेनंतरच्या अभूतपूर्व यशाने विश्व हिंदू परिषदेला एका टप्प्यावर आणून सोडले होते… तो टप्पा होता - श्रीरामजन्मभूमी मुक्ती यज्ञ! ६ मार्च १९८३ मध्ये मुझफ्फरनगर (लक्ष्मीनगर) येथील विराट हिंदू संमेलनाचे अध्यक्ष होते गुलजारीलाल नंदा आणि प्रमुख अतिथी होते प्रा. राजेंद्रसिंह उपाख्य रज्जूभय्या. याच हिंदू संमेलनात दाऊदयाळ खन्ना यांनी ठेवलेल्या  एका साधारण प्रस्तावाने पुढे भारताचे मानसपटल आणि कालचक्र असे काही फिरवले त्याचीच फलश्रुती म्हणजे ५ ऑगस्ट २०२० चा भाग्याचा क्षण होय.  मुक्ती यज्ञाचे स्वरूप उत्तरप्रदेशपर्यंतच मर्यादित होते.

यादरम्यान, मोरोपंतांच्या मार्गदर्शनात श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाने आता अखिल भारतीय स्वरूप धारण केले होते. भारताच्या प्रत्येक गावात शिलापूजनाचे कार्यक्रम झाले. प्रत्यक्ष शिलान्यासाच्या आधी कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्हातील शिला अयोध्येतील येतील हे दिवसागणिक निश्चित होते. शिलापूजनाला देशभरातून कोण मान्यवर कधी येणार याचे अचूक मार्गदर्शन मोरोपंत करीत होते. मोरोपंताच्या योजनेतूनच अयोध्या समन्वयाच्या अनेक योजना ठरल्या. रामसेवकपूरम कार्यशाळा ही मोरोपंताचीच योजना. कारसेवकपूरम येथे वर्षभर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण व्यवस्था आणि अयोध्येतील जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार अनेक योजना मोरोपंतांनी साकारल्या. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com