
Agneepath Scheme: अग्निवीरांचं 4 वर्षानंतर काय होणार? घ्या जाणून
नवी दिल्ली : केंद्राने अग्निपथ लष्कर भरती जाहीर केली आहे. या माध्यमातून भरती होणाऱ्या युवकांना अग्निवीर म्हणून संबोधण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलंय. या सेवेचा काळ चार वर्षाचा असून त्यानंतर युवकांना या सेवेतून निवृत्त व्हावं लागणार आहे. या निर्णयानंतर बऱ्याच माध्यमातून सरकारवर टीका करण्यात आली होती. काही ठिकाणी सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शने करण्यात आले आहेत. तर चार वर्षाच्या सेवेनंतर अग्निवीर काय करणार यासंबंधी केंद्राकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
(Agneepath Scheme)
4 वर्षांनंतर कर्तव्यातून मुक्त झालेल्या अग्निवीरांना काय सुविधा देणार?
चार वर्षाच्या सेवेनंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज उपलब्ध होईल. या निधीसाठी अग्निवीरांच्या मासिक पगारातील 30 टक्के रक्कम कापली जाणार आहे. तेवढीच रक्कम सरकार जमा करणार आहे. 4 वर्षांनंतर सैन्यातून मुक्त झालेल्या अशा 75 टक्के अग्निवीरांना 11.71 लाख रुपयांचे सेवा निधी पॅकेज दिले जाईल. यावर कोणताही कर लागणार नाही.
याशिवाय त्यांना स्किल सर्टिफिकेट आणि बँक लोनच्या माध्यमातून दुसरी नोकरी सुरू करण्यासाठी मदत केली जाईल. 12 वीच्या पुढील युवकांसाठी ब्रिजिंग कोर्सची सुविधा देणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
हेही वाचा: SSC Result 2022: कमी मार्क पडलेत? पेपर कसा कराल रिचेक?
चार वर्षांच्या सेवेनंतर सैन्यदलातून मुक्त झालेल्या तरुणांना केंद्र व राज्य सरकार नोकरीत प्राधान्य देणार आहे. CAPF आणि आसाम रायफल्समध्ये भरती करताना त्यांना प्राधान्य मिळेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी ही घोषणा केली. याशिवाय यूपी सरकार, उत्तराखंड सरकार आणि मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या पोलीस भरतीमध्ये या तरुणांना प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. या 75 टक्के अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल असं सरकारने म्हटले आहे.
इंजिनियरिंग, मेकॅनिक, कायदे, व्यवस्था अशा विविध क्षेत्रांतील कार्याचा अनुभव आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आयटी, सिक्योरिटी, इंजिनियरिंग या क्षेत्रांत कुशल अग्निवीरांना प्राधान्य देण्याची घोषणा सरकारद्वारे करण्यात आली आहे.
Web Title: Agneepath Scheme After 4 Year What Will Happen With Agneevir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..