सर्वांत लांब पल्ल्याच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : भारताचे सर्वांत लांब पल्ल्याचे आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीने विकसित केलेले आणि आण्विक क्षमता असणारे अग्नी 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे आज प्रक्षेपण करण्यात आले. 

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी-5 या स्वानातीत क्षेपणास्त्राचा पल्ला 5000 किलोमीटर एवढा असून, आशियातील बहुतांश प्रदेश आणि युरोपातील लक्ष्य भेदण्याची क्षमता त्यामध्ये आहे. उत्तर चीनमध्येही हे क्षेपणास्त्र पोचू शकते. 

ओडिशा किनाऱ्यालगत व्हीलर बेटावरून इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या प्रक्षेपण इमारत क्रमांक चारमधील एका मोबाईल लाँचरवरून सोमवारी सकाळी या तीनस्तरीय भरीव प्रॉपेलंट क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. 
अग्नी-5 चे प्रक्षेपण ही लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ही चौथी विकासात्मक चाचणी, तर दारुगोळ्यातील धातूचे सिलिंडर वापरून घेतलेली ही दुसरी चाचणी आहे, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

Web Title: agni v missile test launched off odisha coast