Agnipath Scheme: योजना मोदी सरकारची; पण ट्रेंड होतायत हरिवंशराय बच्चन

मोदी सरकारने सैन्यभरतीसाठी आणलेल्या या अग्निपथ योजनेला होत असलेला विरोध तीव्र होत आहे.
Agnipath Recruitment Scheme
Agnipath Recruitment SchemeSakal

अग्निपथ शब्द सध्या जोरदार ट्रेंड होताना दिसत आहे. मोदी सरकारने सैन्यभरतीसाठी आणलेल्या या अग्निपथ योजनेला होत असलेला विरोध तीव्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या ही योजना काय आहे, तिला अग्निपथ हे नाव कशावरुन पडलं आणि बरंच काही...! (How Agnipath Recruitment Scheme got it's name)

काय आहे अग्निपथ योजना?

अग्निपथ (Agnipath Recruitment Scheme) या योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाईल. साडे सतरा ते २३ वर्षांच्या तरुणांना सेवेत घेण्यात येईल. आणि चार वर्षांतच हे जवान निवृत्त होतील. भरती झालेल्या जवानांपैकी २५ टक्के पात्र जवानांना सैन्यात ठेवलं जाईल.

Agnipath Recruitment Scheme
"मोदींना पुन्हा माफिवीर व्हावं लागेल"; 'अग्निपथ'वरुन राहुल गांधी भडकले!

अग्निपथ या शब्दामागची प्रेरणा काय?

हा शब्द भारतातले प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतून घेतलेला आहे. १९९० मध्ये अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला अग्निपथ हा चित्रपट आला. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी एका दिवंगत प्राथमिक शिक्षकाच्या मुलाची भूमिका केली होती. तर २०२२ मध्ये याच नावाने या चित्रपटाचा रिमेक आला होता, ज्यामध्ये हृतिक रोशन प्रमुख भूमिकेत होता.

Agnipath Recruitment Scheme
काही लोक 'अग्निपथ'च्या विरोधात गैरसमज पसरवत आहेत : राजनाथ सिंह

कोणती आहे ही कविता?

हरिवंशराय बच्चन यांची कविता खालीलप्रमाणे -

वृक्ष हों भले खडे,

हों घने हों बडे,

एक पत्र छाँह भी,

माँग मत, माँग मत, माँग मत,

अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ

तू न थकेगा कभी,

तू न रुकेगा कभी

तू न मुडेगा कभी

कर शपथ, कर शपथ, कर शपथ

अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ

यह महान दृश्य है,

चल रहा मनुष्य है,

अश्रु स्वेद रक्त से,

लथपथ लथपथ लथपथ,

अग्निपथ अग्निपथ अग्निपथ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com