
Agnipath Scheme : अग्नि वीरांना आता प्रथम ऑनलाइन परीक्षा अनिवार्य
नवी दिल्ली - लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. त्यानुसार आता सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रथम ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागणार आहे. यानंतर शारीरिक तंदुरुस्ती आणि वैद्यकीय चाचण्या होतील. लष्कराकडून याबाबतची अधिसूचना फेब्रुवारी च्या मध्यापर्यंत जारी होण्याची शक्यता असून पहिली अग्निवीर सामाईक प्रवेश परीक्षा एप्रिल २०२३ मध्ये होणार आहे.
अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, त्यानंतर वैद्यकीय चाचणी आणि अंतिम टप्प्यात सीईई उत्तीर्ण होणे आवश्यक होते. आता ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा ही पहिली पायरी आहे. यामुळे उमेदवारांचे स्क्रीनिंग सुलभ करण्यात देखील मदत करेल. नवीन भरती प्रक्रिया २०२३-२४ च्या पुढील टप्प्यातील ४० हजार उमेदवारांना लागू होईल.
लष्कराच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की देशभरात सुमारे २०० ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बदललेली पद्धत निवडीदरम्यान संज्ञानात्मक पैलूवर अधिक लक्ष केंद्रित करेल. त्याची देशभरात व्यापक पोहोच असेल आणि भरती रॅलींदरम्यान दिसणारी प्रचंड गर्दी देखील कमी होईल यामुळे प्रशासनिक कर्चात बचत होईल अशी आशा लष्करी सूत्रांनी व्यक्त केली..पहिली सीईई परीक्षा एप्रिलमध्ये घेतली जाईल.
भारतीय सैन्याच्या वतीने 'भारतीय सैन्यात भरतीमध्ये परिवर्तनात्मक बदल' या शीर्षकाखाली प्रकाशित केलेल्या वृत्तपत्रीय जाहिरातीत भरती प्रक्रियेच्या नवीन तीन-टप्प्यांवरील पद्धतीबद्दल माहिती देते. पहिली पायरी सर्व उमेदवारांसाठी नियुक्त केंद्रांवर ऑनलाइन प्रवेश परीक्षा असेल. सीईई मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि शेवटी वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.