अग्निपथ योजनेचा विरोध सुरूच, आंदोलनामुळे ३७९ रेल्वे गाड्या रद्द

agnipath scheme protest over agnipath scheme did not end 369 trains canceled due to protests
agnipath scheme protest over agnipath scheme did not end 369 trains canceled due to protests

Agnipath Scheme Protest : सशस्त्र दलात भरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध लक्षात घेता, रेल्वेने शनिवारी ३६९ गाड्या रद्द केल्या. रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये २१० मेल एक्सप्रेस आणि १५९ पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. (agnipath scheme protest over agnipath scheme did not end 369 trains canceled due to protests)

आधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेने दोन मेल एक्स्प्रेस अंशत: रद्द केल्या आहेत, त्यामुळे रद्द झालेल्या गाड्यांची एकूण संख्या ३७१ आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेत चार वर्षांसाठी सैनिकांची भरती करण्याचा आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७५ टक्के निवृत्ती वेतन आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभांशिवाय निवृत्त करण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेला देशातील विविध भागांतून तरुणांकडून तीव्र विरोध होत आहे.

agnipath scheme protest over agnipath scheme did not end 369 trains canceled due to protests
रवी राणांना होणार अटक?; अमरावती पोलिसांकडून वॉरंट जारी

या योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी रस्ते आणि रेल्वे मार्ग रोखले आणि रेल्वेचे डबे पेटवून दिले. बिहारमध्ये शनिवारी आंदोलनाच्या समर्थनार्थ बंद पुकारण्यात आला होता, तर पाटणा जिल्ह्यातील मसौरी उपविभागात बंद समर्थकांनी तारेगाना रेल्वे स्टेशनला आग लावली. पूर्व मध्य रेल्वेने सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील ३२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

agnipath scheme protest over agnipath scheme did not end 369 trains canceled due to protests
तो चमत्कार तर घडणारच आहे, पण..; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com