हिंसाचारात सहभागी नव्हतो; 'अग्निवीर' उमेदवारांना द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र

Agneepath Scheme Violence
Agneepath Scheme Violenceesakal

नवी दिल्ली : केंद्राच्या नवीन लष्करी भरती योजना 'अग्निपथ' (Agnipath) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ते देशभरात होत असलेल्या कोणत्याही हिंसक निदर्शने किंवा जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभागी नव्हते असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. (agniveer applicants must pledge they didn t participate in agnipath arson protests say military officers)

रविवारी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना, लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव, लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले, सर्व अग्निवीरांना प्रतिज्ञापत्र देऊन हे स्पष्ट करावे लागेल की त्यांनी कधीच अशा कोणत्याही हिंसक निदर्शनात किंवा जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभाग घेतला नाही. ते म्हणाले, शिस्त ही सशस्त्र दलांची मूलभूत गरज आहे. कोणत्याही उमेदवाराविरुद्ध एफआयआर असल्यास ते त्यात सहभागी होऊ शकत नाहीत.

अग्निपथ योजनेबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज तिन्ही लष्करप्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नाही. मात्र त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेबाबत आज दोन दिवसांत दुसऱ्यांदा लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेऊन या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये, डीएमएचे अतिरिक्त सचिव, लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी केंद्राच्या योजनेची संपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी ही योजना त्यांच्यासाठी फायदेशीर आहे हे तरुणांना समजावून सांगितले पाहिजे यावर भर दिली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, भारतीय सैन्यात 30 वर्षे वयाचे सैनिक मोठ्या संख्येने आहेत. लष्करातील जवानांचे वय चिंताजनक आहे. अशा स्थितीत लष्कराला जोश आणि होश या दोन्हींची जोड हवी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Agneepath Scheme Violence
MLC Election 2022: उद्या भाजपलाच धक्का बसू शकतो, रोहित पवारांचा इशारा

14 जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने सैन्यात भरतीसाठी 'अग्नवीर योजना' सुरू केली होती. ज्यामध्ये 17 ते 22 वयोगटातील तरुणांना सैन्यात भरती करण्याची तरतूद होती. योजनेत अग्निवीर जवानांना 4 वर्षांनंतर सेवेतून निवृत्त होण्याची तरतूद आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर देशातील तरुणांमध्ये नाराजी पसरली आणि देशाच्या अनेक भागांत या योजनेला विरोध सुरू झाला. यानंतर उत्तर प्रदेश, बिहार आणि तेलंगणामध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. तेलंगणात शुक्रवारी झालेल्या निदर्शनांदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू देखील झाला. तसेच सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी तीन गाड्या पेटवून दिल्या.

Agneepath Scheme Violence
'2032 पर्यंत सैन्यात 50 टक्के 'अग्निवीर' असणार, दरवर्षी दीड लाख तरुणांची होणार भरती'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com