आरोपींना सोडविण्यासाठी बजरंग दलाचा पोलिस स्थानकावर हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

फतेहपूर सुक्री पोलिस स्थानकात पोलिसांनी ताब्यात घेलतेल्या बजरंग दलाच्या पाच कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्थानकावर हल्ला केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक पोलिस निरीक्षक जखमी झाले आहेत.

आग्रा : फतेहपूर सुक्री पोलिस स्थानकात पोलिसांनी ताब्यात घेलतेल्या बजरंग दलाच्या पाच कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठी बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्थानकावर हल्ला केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक पोलिस निरीक्षक जखमी झाले आहेत.

अल्पसंख्यांक समुदायातील एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या आरोपाखाली शनिवारी सकाळी पोलिसांनी बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्यांना सदर बाजार येथील फतेहपूर सुक्री पोलिस स्थानकात ठेवण्यात आले होते. त्यानंतर बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेचे काही कायकर्ते पोलिस स्थानकात आले. तेथील एका पोलिस अधिकाऱ्याशी त्यांचे वाद झाले. वाद वाढल्याने विश्‍व परिषदेचे नेते जगमोहन चाहर यांनी अधिकाऱ्याला कानाखाली मारली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

काही वेळातच मोठा जमाव पोलिस स्थानकाभोवती जमा झाला. जमावाने पोलिस स्थानकावर दगडफेक केली. पोलिसांनाही त्याच प्रकारे उत्तर दिल्याचे स्थानिकांनी सांगितले. हा सर्व प्रकार अर्धा तास चालला. त्यानंतर आणखी 5-6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या पाच जणांना सदर बाजार पोलिस स्थानकात हलविण्यात आले. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्थानकावर हल्ला केला. जमावाने पोलिसांचे वाहनही पेटवून दिले. या सर्व प्रकारात एक पोलिस निरीक्षक जखमी झाले आहेत.

Web Title: Agra: Bajrang Dal activists attack police station to rescue 5 from lock-up