'राम' लिहिलेला दुपट्टा काढल्यानंतरच ताजमहलमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

आग्रा (उत्तर प्रदेश)- प्रसिद्ध ताजमहालामध्ये प्रवेश करताना एका मॉडेलच्या खांद्यावर 'राम' हे शब्द लिहिलेला दुपट्टा बाहेर काढून ठेवल्यानंतरच प्रवेश करू देण्यात आल्याचा प्रकार नुकताच येथे घडला आहे.

दिल्लीमध्ये सुपर मॉडेल इंटरनॅशनल 2017 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी तब्बल 34 देशांमधून 46 मॉडेल्स दाखल झाल्या आहेत. यामध्ये अमेरिका, नेदरलॅंड, श्रीलंका, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया व इतर देशांमधील मॉडेल्सचा सहभाग आहे.

एका प्रायोजक असलेल्या कंपनीने या मॉडेल्सला ताजमहाल भेटीचे आयोजन केले होते. ताजमहलाच्या प्रवेशद्वारावर एका मॉडेल्सच्या खांद्यावर 'राम' लिहिलेला दुपट्टा असल्यामुळे तो काढून ठेवण्यात आला. परंतु, कंपनीच्या नावाने असलेले टी-शर्ट व डोक्यावरील टोप्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. ताजमहालमध्ये कोणत्याही कंपनीचा प्रचार करण्यास बंदी आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

दरम्यान, हिंदू जागरण मंचाचे प्रदेशाध्यक्ष अविनाश राणा यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

Web Title: agra super models get entry in taj mahal by removing ramname dupatta