संरक्षण मंत्रालयाचे ‘बेल’ सोबत करार; ३ हजार १०२ कोटी रुपयांच्या कंत्रांटावर स्वाक्षऱ्या

हवाई दलाच्या विमानांना मोठे सुरक्षा कवच मिळणार
Agreement BEL- Bangalore Ministry of Defense Advanced Electronic Warfare Suite Bangalore
Agreement BEL- Bangalore Ministry of Defense Advanced Electronic Warfare Suite Bangaloresakal

बंगळूर : देशाच्या संरक्षणसज्जतेमध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या कंपनीच्या बंगळूर आणि हैदराबाद येथील केंद्रांशी तब्बल ३ हजार १०२ कोटी रुपयांचे दोन करार केले आहेत. ‘बीईएल- बंगळूर’सोबत भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘अॅडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक वारफेअर सूट’च्या (डब्लईएफ) पुरवठ्यासाठी करार करण्यात आला आहे.

यासाठी कंत्राटाची किंमत १ हजार ९९३ कोटी रुपये एवढी आहे. या सूटमुळे हवाई दलाच्या विमानांना मोठे सुरक्षा कवच मिळणार आहे. शत्रू राष्ट्रांना रडारच्या माध्यमातून देखील त्यांचा चटकन वेध घेणे शक्य होणार नाही. या ‘ईडब्लू’ सूटचा आराखडा आणि त्याची निर्मिती ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) केली आहे. ‘इन्स्ट्रूमेंटेड इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर रेंज’च्या (आयईडब्लूआर) खरेदीसाठी ‘बीईएल- हैदराबाद’सोबत करार करण्यात आला आहे.

संरक्षणसिद्धता वाढणार

हे दोन्ही करार भारतीय हवाई दलाची संरक्षणसिद्धता वाढविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या कंत्राटाची किंमत देखील १ हजार १०९ कोटी रुपये एवढी आहे. हे दोन्ही प्रकल्प संरक्षणाच्या क्षेत्रात भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com