चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्‍यतेची इस्रोकडून तपासणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

इस्रो आणि इतर संस्था चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्‍यतेचा अभ्यास करण्यासाठी काही प्रयोग राबवित आहेत. चंद्रावर मानवी वस्तीच्या उद्दिष्टासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करण्यात येत आहे

नवी दिल्ली - चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्‍यतेचा अभ्यास इस्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज (गुरुवार) यासंदर्भातील माहिती दिली.

""इस्रो आणि इतर संस्था चंद्रावर मानवी वस्तीच्या शक्‍यतेचा अभ्यास करण्यासाठी काही प्रयोग राबवित आहेत. चंद्रावर मानवी वस्तीच्या उद्दिष्टासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करण्यात येत आहे,'' असे सिंह म्हणाले. भारताने याआधी चंद्रावर यान पाठविले आहे. इस्रोकडून आता चांद्रयान-2 प्रकल्पाची तयारी करण्यात येत आहे.

चंद्राच्या कक्षेत (ऑर्बिट) 2020 पर्यंत अवकाश स्थानक बांधण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय पृथ्वीवरुन प्रक्षेपित करण्यात असलेले रेडिओ सिग्नल चंद्राच्या ज्या भागांमध्ये पोहोचू शकत नाहीत, अशा भागांविषयी चीनही संशोधन करणार आहे. अवकाश संशोधनासंदर्भातील थेट पंतप्रधानांकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षांत अवकाश संशोधनास पाठबळ दिल्याचे आढळून आले आहे.

या पार्श्‍वभूमीवर भारताकडून घेण्यात आलेली ही मोहिम अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

Web Title: Ahead of Chandrayaan-2 launch, ISRO looking at habitation on moon