गुजरातमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

अहमदाबाद- येथील एका कुटुंबियांच्या मोटारीमध्ये 12.4 लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

अहमदाबाद- येथील एका कुटुंबियांच्या मोटारीमध्ये 12.4 लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील तिघे जण मोटारीतून प्रवास करत होते. मोटार तपासणीसाठी थांबविल्यानंतर मोटारीत 12.4 लाख रुपये आढळून आले. सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या आहेत. विवाहासाठी विविध बँकामधून ही रक्कम काढल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु, विवाहाची पत्रिका अथवा विविध कागदपत्रे ते देऊ शकले नाहीत. यामुळे ही रक्कम प्राप्तिकर विभागाकडे जमा करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. शिवाय, वाहनांचीही तपासणी केली जात आहे. यामध्ये मोठ-मोठ्या रकमा पुढे येताना दिसत आहेत.

Web Title: Ahmedabad: 500 Brand-New 2,000-Rupee Notes found in car