अहमदाबादमध्येही अँटी-रोमिओ स्क्वॉड सुरू

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

आता कायमस्वरूपी हे स्क्वॉड तयार करण्यात येणार आहे. यामध्ये महिला व पुरुष असा दहा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

अहमदाबाद - उत्तर प्रदेशापाठोपाठ आता भाजपचे सरकार असलेल्या गुजरातमधील अहमदाबाद शहरात अँटी-रोमिओ स्क्वॉड सुरु करण्यात आले आहे. 

अहमदाबाद पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरुपी अँटी-रोमिओ स्क्वॉडची स्थापन केले आहे. गुजरातमध्ये 1999 मध्ये कायदेशीररीत्या अँटी-रोमिओ स्क्वॉड सुरु करण्यात आले आहे. तेव्हा हे देशातील पहिले राज्य ठरले होते. अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोट या शहरांमध्ये हे स्क्वॉड सुरु करून, नववर्षाचे कार्यक्रम, नवरात्री, गौरी व्रत या काळात महिलांच्या सुरक्षेसाठी हे स्कॉड काम करत होते.

आता कायमस्वरूपी हे स्क्वॉड तयार करण्यात येणार आहे. यामध्ये महिला व पुरुष असा दहा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. या स्क्वॉडच्या सहायक पोलिस आयुक्त पन्ना मोमय्या यांनी सांगितले, की या स्क्वॉडच्या कामकाजाला 18 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी हे स्क्वॉड काम करेल. अल्पवयीन व शाळकरी मुलींच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे.

Web Title: Ahmedabad follows UP model, to get anti-Romeo squad