काँग्रेसचे तीन आमदार भाजपवासी; गुजरातमधील गळती थांबेना

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जुलै 2017

अहमदाबाद : गुजरातमध्ये काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला असून आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे आतापर्यंत भाजपवासी झालेल्या आमदारांची संख्या सहावर पोचली आहे.

आमदारांच्या या फाटाफुटीमुळे काँग्रेसच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. येत्या आठ ऑगस्ट रोजी राज्यसभेसाठी निवडणूक होत असून गुजरातमधून काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांना रिंगणात उतरविले आहे. आमदारांची ही गळती थांबली नाही, तर अहमद पटेलांचे भवितव्य संकटात येऊ शकते. बालासिनोरचे आमदार मानसिंह चौहान आणि वनसदाचे छन्नाभाई चौधरी यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष रमणलाल व्होरा यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आनंदमधील थासराचे आमदार रामसिंह परमार यांनीही राजीनामा दिल्याचे समजते. आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे काँग्रेसची विधिमंडळातील सदस्यसंख्या घटली आहे. मागील आठवड्यामध्ये ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. याआधी बलवंतसिंह राजपूत, तेजश्रीबेन पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Web Title: ahmedabad news congress mla and bjp gujrat