'ब्लू व्हेल'ची माहिती देणाऱ्यास लाखाचे इनाम

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

गेम बंदीनंतर गुजरात सरकारची घोषणा

अहमदाबाद: भारतात धुमाकूळ घालीत असलेल्या व पालकांसाठी चिंतेचे कारण बनलेल्या "ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेमच्या प्रवर्तकाची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस देण्याचे गुजरात सरकारने शुक्रवारी जाहीर केले.

गेम बंदीनंतर गुजरात सरकारची घोषणा

अहमदाबाद: भारतात धुमाकूळ घालीत असलेल्या व पालकांसाठी चिंतेचे कारण बनलेल्या "ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेमच्या प्रवर्तकाची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस देण्याचे गुजरात सरकारने शुक्रवारी जाहीर केले.

हा गेम खेळणाऱ्या अनेकांनी त्याच्या शेवटच्या आव्हानानुसार आत्महत्या करून जीवन संपविले आहे. त्यामुळेच "डेथ गेम' ठरलेल्या ब्लू व्हेलवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बंदी घातल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली आहे. या गेममधील दिलेल्या धोकादायक आव्हानांशी संबंधित आणि हा गेम खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्यांची सत्य माहिती देणाऱ्यास गुजरात सरकार एक लाखाचे इनाम देणार आहे. राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा म्हणाले, की माहिती देणाऱ्याचे नाव सरकार गुप्त ठेवणार आहे. तसेच या गेमचा प्रवर्तक म्हणून काम करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

ब्लू व्हेल गेम खेळताना लहान मुलांनी किंवा तरुणांनी आत्महत्या केल्याची नोंद गुजरातमध्ये अद्याप झालेली नाही. मात्र गेल्या आठवड्यात शहरातील साबरमती नदीत जीवन संपविणाऱ्या अशोक ठाकोर (वय 21) याने आपण "ब्लू व्हेल'चे आव्हान पूर्ण करीत असल्याचे फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. मृत्यूला सामोरे जाण्यापूर्वी त्याने ही माहिती फेसबुकवर दिली होती.

Web Title: ahmedabad news Gujarat government and 'blue whales' game