'सेक्‍स व्हिडिओ' भाजपचे कारस्थान

महेश शहा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

अहमदाबाद : पाटीदार अनामत आंदोलन समितीचे समन्वयक हार्दिक पटेल यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी आणि मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीच हे कारस्थान रचले असून, त्यासाठी 40 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीचे समन्वयक आणि नेते दिनेश बांभनिया यांनी केला आहे.

सुरतमधील विपुल मेंदपारा आणि विमल पटेल या दोन व्यक्तींनी वाघानी आणि रूपानी यांच्या सांगण्यावरून या व्हिडिओ क्‍लिप तयार केल्या आहेत. आमच्या समितीतील 52 नेत्यांच्या क्‍लिप भाजपने तयार केल्या असून, यामध्ये हार्दिक पटेल यांच्याशी संबंधित 22 व्हिडिओ क्‍लिपचा समावेश आहे. या सर्व क्‍लिप बनावट असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या मुलीने हार्दिक यांच्याविरोधात तक्रार नोंदविली होती, तिच्यावर देखील भाजप नेत्यांनी दबाव आणला होता. तिला एका भाजप नेत्याने तीन लाख रुपये दिले होते. आता या नेत्याविरोधात खटला भरण्यासाठी आम्ही कायदेतज्ज्ञांची मदत घेऊ, असे बांभनिया यांनी सांगितले.

पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या नेत्यांनी सेक्‍स व्हिडिओबाबत विधाने करताना त्यामागे भाजपचा हात आहे हे सिद्ध करणारे पुरावे देखील द्यावेत. या व्हिडिओबाबत आम्ही कसलेही वक्तव्य केलेले नाही, अथवा कोणावर आरोपही केले नाहीत. दुर्दैवाने विनाकारण आम्हाला यामध्ये ओढण्यात आले आहे.
- नितीन पटेल, उपमुख्यमंत्री, गुजरात

मन्सात हार्दिकची सन्मान रॅली
कथित सेक्‍स व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या हार्दिक पटेल यांनी गांधीनगर जिल्ह्यातील मन्सा येथे उद्या (ता. 18) "सन्मान रॅली'चे आयोजन केले आहे. पटेलांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलल्याचे पाटीदार नेत्यांनी म्हटले आहे. या रॅलीमध्ये 50 हजार पटेल युवक सहभागी होण्याची शक्‍यता असल्याचे "अनामत आंदोलन' समितीचे नेते अतुल पटेल यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ahmedabad news gujrat sex video and bjp