गुजरातवर जपानी कंपन्यांची "अर्थ'कृपा

महेश शहा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

विविध प्रकल्पांत दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

अहमदाबाद: भारत आणि जपानदरम्यान उद्या (ता. 14) होणाऱ्या बाराव्या वार्षिक गुंतवणूक संमेलनामध्ये अनेक महत्त्वाचे करार मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. जपानमधील पंधरा बड्या कंपन्या गुजरातमध्ये विविध क्षेत्रांत दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गांधीनगरमध्ये होणाऱ्या या संमेलनामध्ये जपानी उद्योजकांकडूनही गुंतवणुकीच्या काही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्या हस्ते उद्या अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे साबरमती रेल्वे स्थानक येथे भूमिपूजन केले जाणार आहे. या गुंतवणूक संमेलनामध्ये अनेक सामंजस्य करार होणे अपेक्षित आहे. गुजरातमधील पायाभूत प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठीही जपानने पुढाकार घेतला असून यासाठी "जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी' (जेआयसीए) राज्य सरकारला स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती गुजरातचे मुख्य सचिव जे. एन. सिंह यांनी दिली.

बड्या कंपन्यांचा सहभाग
मोरेस्को, टोयोटा गोसेई, टोपरे आणि मुराकामीसारख्या बड्या कंपन्या या गुंतवणूक संमेलनामध्ये सहभागी होत आहेत. याबाबत बोलताना गुजरात औद्योगिक विकास महामंडळाचे (जीआयडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. थारा म्हणाले, ""या संमेलनामध्ये 17 ते 18 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होणे अपेक्षित आहे. यातील पंधरा करार हे केवळ जपानी कंपन्या आणि "जीआयडीसी'मध्ये होणार आहेत.''

इंडस्ट्रिअल पार्कची उभारणी
जपानच्या सहकार्याने गुजरातमध्ये साकारल्या जाणाऱ्या दोन टप्प्यांतील इंडस्ट्रिअल पार्कच्या उभारणीसाठी 25 हजार कोटी रुपयांचे करार केले जाणार आहेत. गांधीनगरमध्ये भारतीय आणि गुजराती उद्योजक यांची एक बैठक होणार असून या बैठकीत या करारांबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे. आण्विक कार्यक्रम अधिक बळकट करण्यासाठी भारत जपानी कंपन्यांशी हातमिळवणी करण्याच्या विचारात आहे.

प्रशिक्षण केंद्रही गुजरातेत
देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सहाशे कोटी रुपये खर्च करून बडोदा येथे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असल्याचे "नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन'च्या (एनएचआरसी) अधिकाऱ्यांनी सांगितले. "नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंडियन रेल्वे'च्या (एनएआयआर) पाच एकर परिसरामध्ये हे केंद्र उभारले जाणार आहे, अशी माहिती "एनएचएसआरसी'चे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंत हे केंद्र कार्यान्वित होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: ahmedabad news Japanese companies "Earth" in Gujarat