दंगली दिवशी कोडनानींना विधानसभेत भेटलो: अमित शहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून अमित शहांची न्यायालयात साक्ष

अहमदाबाद: 2002 मध्ये नरोदा गाममध्ये झालेल्या दंगलीच्या दिवशी माजी मंत्री माया कोडनानी यांना गांधीनगर येथील राज्य विधानसभेत आणि त्यानंतर अहमदाबाद येथे सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेटल्याची साक्ष भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) एका विशेष न्यायालयात दिली.

नरोदा गाम दंगल प्रकरणात भाजप नेत्या माया कोडनानी यांच्या वतीने बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून अमित शहा आज न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांनी न्यायाधीश पी. बी. देसाई यांच्यासमोर आपले म्हणणे नोंदविले. कोडनानी यांच्या एका अर्जावर न्यायालयाने शहा यांना पाचारण केले होते.

अमित शहा यांनी न्यायालयाला सांगितले, की 28 फेब्रुवारी 2002ला नरोडा गाम दंगलीदरम्यान कोडनानी गुजरात विधानसभेत उपस्थित होत्या. या घटनेच्या दिवशी सकाळी मी त्यांना सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्येही भेटलो होतो. पोलिसांनी हॉस्पिटलमधून सुरक्षितरीत्या बाहेर काढल्यानंतर कोडनानी कोठे गेल्या, हे मात्र माहीत नाही.

कोडनानी यांनीही दंगलीच्या वेळी आपण विधानसभेत होतो आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्याचा तसेच त्या ठिकाणी अमित शहाही उपस्थित होते, असा दावा केला होता. साबरमती रेल्वेच्या डब्यांना आग लावल्याच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कारसेवकांचे मृतदेह गोध्राहून सोला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. दंगलीच्या ठिकाणी आपण उपस्थित नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. 2002मध्ये आमदार बनलेल्या कोडनानी यांना तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये 2007मध्ये राज्यमंत्री बनविण्यात आले होते.

Web Title: ahmedabad news Kodnani met in the Legislative Assembly: Amit Shah