गुजरातमध्ये आल्यापासून माझे वजन वाढतेय : राहुल

वृत्तसंस्था
बुधवार, 6 डिसेंबर 2017

अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येथे आलेले काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी हे पूर्णपणे गुजराती होऊन गेल्याची झलक आज कच्छमधील सभेत पाहायला मिळाली.

येथे सभेला उद्देशून बोलताना ते म्हणाले की, "गुजरातमध्ये आल्यापासून माझे वजन वाढत असून तुम्ही लोकांनी माझ्या खानपानाच्या सवयीच बिघडून टाकल्या आहेत. काल माझी बहीण घरी आली होती, तेव्हा माझे स्वयंपाक घर पाहून तिलाही आश्‍चर्याचा धक्काच बसला, कारण घरामध्ये लोणचे, भुईमुगापासून सर्वच खाद्यपदार्थ गुजराती होते.''

या वेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचाही समाचार घेतला. ""मी मोदींचे भाषण ऐकले तेव्हा त्यामध्ये 60 टक्के गोष्टी या काँग्रेसच्याच होत्या. ही निवडणूक काँग्रेस अथवा भाजपसाठी नसून ती गुजरात आणि गुजरातींच्या भविष्यांसाठी आहे याचा त्यांना विसर पडलेला दिसतो,'' असे त्यांनी स्पष्ट केले. जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीवरूनही राहुल गांधी यांनी सरकारला लक्ष्य केले. दरम्यान ओखी चक्रीवादळामुळे राहुल गांधी यांच्या तीन ठिकाणांवरील सभा रद्द करण्यात आल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: ahmedabad news My weight is increasing since coming to Gujarat: rahul gandhi