शरीरसुखाला नकार देणाऱ्या पतीविरोधात महिलेची पोलीस ठाण्यात तक्रार

मी शरीरसुखाची मागणी केल्यानंतर मला अमानुष पद्धतीने मारहाण केली जायची.
love affair
love affair File photo

अहमदाबाद: वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास त्याचबरोबर शरीरसंबंध (physical relation) सुद्धा महत्त्वाचे असतात. शरीरसंबंध सुद्धा वैवाहिक जीवनात (Married life) तणावाचे कारण ठरु शकतात. अशीच एक घटना गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) समोर आली आहे. अहमदाबादच्या दानीलिमिडा शहरात एका महिलेने पती शरीरसुखापासून वंचित ठेवत असल्याबद्दल महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. महिला पतीकडे शरीरसुखाची मागणी करायची, तेव्हा तो तिला मारहाण करायचा.

अखेर त्याने ऑगस्ट महिन्यात तिला सोडून दिले. महिला २३ वर्षांची असून पतीचे वय २५ आहे. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या २७ तारखेला आपण लग्न केले, असे महिलेने पोलिसांना सांगितले. लग्नानंतर लगेचच पती आणि सासू-सासऱ्यांनी हुंडा मिळाला नाही, म्हणून छळ सुरु केला, असा आरोप तिने एफआयआरमध्ये केला आहे. लग्नानंतर १० दिवस पतीने आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवले, त्यानंतर त्याने शरीरसुख देणे बंद केले, असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

love affair
महेश कोठारेंनी मागितली जाहीर माफी

"आम्ही दोघे बेडरुममध्ये एकत्र असायचो, तेव्हा नवरा खूप विचित्र पद्धतीने वागायचा. मी शरीरसुखाची मागणी केल्यानंतर मला अमानुष पद्धतीने मारहाण केली जायची. त्यानंतर मला बेडरुममध्ये सोडून निघून जायचा" असे आरोप महिलेने एफआयआरमध्ये केला आहे. मला समोर पाहायला आवडत नाही, असे नवऱ्याने आपल्याला सांगितले होते. त्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते, असा आरोप महिलेने केला आहे.

love affair
घातक AIR STRIKE मध्ये मोठी चूक झाल्याचं अमेरिकेनं केलं मान्य

या सगळ्याला कंटाळून तिने एक ऑगस्टला नवऱ्याचे घर सोडले. त्यानंतर सासरकडच्या आणि माहेरच्या मंडळींनी तडजोड घडवून आणली व ती पुन्हा नवऱ्याच्या घरी नांदण्यासाठी गेली. सासरी गेल्यानंतर पुन्हा तिला त्रास देण्यास सुरुवात झाली. नवरा तिला टाळत होता. आठ ऑगस्टला नवऱ्याने आपल्याला सोडले, असा महिलेचा दावा आहे. त्यानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठून सासू-सासरे व नवऱ्याविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com