'जानवेधारी राहुल मुस्लिमांचे दुःख समजूच शकत नाहीत'

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

काँग्रेस आणि तेलगू देसम पक्ष (टीडीपी) हे दोन्ही पक्ष सर्वसामान्य जनतेला लुटणारे आहेत. त्यात जानवेधारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कधीच मुस्लिमांचे दुःख समजून घेऊ शकत नाहीत, अशी जोरदार टीका एमआयएमचे अध्यक्ष असदु्द्दीन ओवेसी यांनी केली आहे. 

हैदराबाद : काँग्रेस आणि तेलगू देसम पक्ष (टीडीपी) हे दोन्ही पक्ष सर्वसामान्य जनतेला लुटणारे आहेत. त्यात जानवेधारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कधीच मुस्लिमांचे दुःख समजून घेऊ शकत नाहीत, अशी जोरदार टीका एमआयएमचे अध्यक्ष असदु्द्दीन ओवेसी यांनी केली आहे. 

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. प्रचाराच्या रिंगणात प्रत्येक राजकीय पक्ष उतरले असून, एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील 119 जागा निवडणुकीसाठी 7 डिसेंबर मतदान होणार आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मदरसे आणि मुस्लिमांची धार्मिक स्थळं बंद करण्याचा प्रयत्न सरू आहे आणि हे (सरकार) आपल्याला (मुस्लिमांना) पाहून घेऊ इच्छित नाहीत, असे म्हटले आहे.    

सैदाबाद येथील सभेत बोलताना ओवेसी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकताच हैदराबादमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. टीडीपी आणि काँग्रेसचा पाकिटमार असा उल्लेख करत राहुल गांधी एखाद्या पर्यटकाप्रमाणे राज्याचा दौरा करत आहेत, असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

Web Title: aimim chief asaduddin owaisi controversial attacks on congress tdp and rahul gandhi