'एम्स'मध्ये कुत्र्यांचे, माकडांचे हल्ले 

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

"एम्स'मधील निवासी डॉक्‍टर संघटनेचे अध्यक्ष हरजितसिंग भट्टी यांनी मेनका गांधी यांना पत्र लिहून संस्थेच्या परिसरात होणाऱ्या कुत्र्यांच्या व माकडांच्या हल्ल्यांपासून रुग्ण व डॉक्‍टर यांचा बचाव कसा करावा, याबद्दल सल्ला मागितला होता. त्याला उत्तर देताना या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली.

नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) परिसरात भटक्‍या कुत्र्यांची व माकडांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांवर हल्ले करीत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यावर येथे अन्नपदार्थ खाण्यासाठी स्वतंत्र जागा निश्‍तिच करावी, जेणे करून सांडलेले व उरलेले अन्न खाण्यासाठी प्राणी येथे येणार नाहीत, असा सल्ला महिला व बाल कल्याण विभागाच्या केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी बुधवारी दिला. 

"एम्स'मधील निवासी डॉक्‍टर संघटनेचे अध्यक्ष हरजितसिंग भट्टी यांनी मेनका गांधी यांना पत्र लिहून संस्थेच्या परिसरात होणाऱ्या कुत्र्यांच्या व माकडांच्या हल्ल्यांपासून रुग्ण व डॉक्‍टर यांचा बचाव कसा करावा, याबद्दल सल्ला मागितला होता. त्याला उत्तर देताना या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली. यात कुत्र्यांवर निर्जंतुकीकरण व लसीकरणासाठी सामाजिक संघटनांची मदत पुरविण्याची तयारी दाखविली.

मात्र, माकडांवर असे करता येणार नाही, असे सांगतानाच रुग्णालयात सहज उपलब्ध होणाऱ्या अन्नाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर एका रात्रीत हे प्राणी नाहीसे होतील, असा सल्ला मेनका गांधी यांनी दिला. 
 

Web Title: AIMMS Hospital Dog Monkey Attacks