Video : तुम्हीही व्हा अभिनंदन! हवाई दलाने लाँच केला अॅक्‍शन गेम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

भारतीय हवाई दलामध्ये कारकीर्द घडविण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज व्हिडिओ गेम लाँच केला आहे. 'इंडियन एअर फोर्स ः ए कट अबोव्ह' असे या व्हिडिओ गेमचे नाव आहे. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल वीरेंद्रसिंह धनोआ यांच्या हस्ते या खास 'फ्लाइट सिम्युलेटर गेम'चे आनावरण करण्यात आले. 

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलामध्ये कारकीर्द घडविण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आज व्हिडिओ गेम लाँच केला आहे. '

lay.google.com/store/apps/details?id=com.threye.iaf.aca&hl=en_IN">इंडियन एअर फोर्स ः ए कट अबोव्ह' असे या व्हिडिओ गेमचे नाव आहे. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल वीरेंद्रसिंह धनोआ यांच्या हस्ते या खास 'फ्लाइट सिम्युलेटर गेम'चे आनावरण करण्यात आले. 

काय आहे या व्हिडिओ गेममध्ये
या व्हिडिओ गेममध्ये विंग कमांडर अभिनंदन यांचे पात्र आहे. त्याशिवाय मिग-21 पासून सुखोई, मिराज, एमआय-17 सारखी लढाऊ विमाने तुम्ही उडवू शकता. 
बालाकोट हवाई हल्ल्याची झलकही व्हिडिओ गेममध्ये दिसणार आहे. हवाई दलाने केलेली ऐतिहासिक कामगिरी व्हिडिओ गेमच्या माध्यमातून अनुभवता येऊ शकेल. हवाई दलाने आपल्या ट्विटर हॅंडलवर गेल्या आठवड्यात या व्हिडिओ गेमचा टीझर जारी केला होता.

तुम्हाला व्हिडिओ गेममध्ये आवडेल असे
हा व्हिडिओ गेम एका वेळी एकच व्यक्ती खेळू शकतो. अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही मोबाईल व्हर्जनमध्ये गेम खेळता येणार आहे. ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत या व्हिडिओ गेमचे मल्टिप्लेअर व्हर्जन येण्याची शक्‍यता आहे. हा व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांना खराखुरा पायलट असल्याचा रोमांचक अनुभव मिळेल, असा दावा हवाई दलाने केला आहे. 

इतर फ्लाइट सिम्युलेटर गेमप्रमाणेच हा गेम खेळणाऱ्यांना पहिल्यांदा ट्रेनिंग दिले जाणार आहे. त्यानंतरच खेळाडूला लढाऊ विमान उडविण्याची संधी मिळेल. या गेममध्ये विविध लढाऊ विमाने आणि अनेक मिशनचा समावेश आहे. सर्व मिशन पार करणाऱ्या खेळाडूला हवाई दलाकडून खास भेटही देण्यात येणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air Force launches action game