मोठी दुर्घटना टळली! दोन विमाने आकाशात आली होती आमने-सामने, अन्... - Air India and Nepal Airlines aircraft almost collided mid-air three air traffic controllers suspended | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Air India and Nepal Airlines aircraft

मोठी दुर्घटना टळली! दोन विमाने आकाशात आली होती आमने-सामने, अन्...

एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सची विमाने आकाशात जवळ आली होती. टक्कर होणार होती. मात्र यंत्रणेने वैमानिकांना सतर्क केले, त्यामुळेमोठा विमान अपघात टळला.

मलेशियाहून येणारे नेपाळ एअरलाइन्सचे विमान आणि दिल्लीहून येणारे एअर इंडियाचे विमान यांच्यात धडक झाली असती. यावेळी विमानात बसलेल्या प्रवाशांचा श्वास रोखला गेला होता. ही घटना शुक्रवारची आहे. 

नेपाळच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने याप्रकरणी (CAAN) तीन हवाई वाहतूक नियंत्रकांना निष्काळजीपणासाठी काढून टाकले आहे. CAAN चे प्रवक्ते जगन्नाथ निरौला यांनी ही माहिती दिली आहे. 

CAAN चे प्रवक्ते निरौला यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी नेपाळ एअरलाइन्सचे विमान मलेशियाच्या क्वालालंपूरहून काठमांडूला येत होते. त्याचवेळी एअर इंडियाचे विमान दिल्लीहून काठमांडूला येत होते. 

एअर इंडियाचे विमान सुमारे 19,000 फूट उंचीवरून खाली येत होते. त्याचवेळी नेपाळ एअरलाइन्सचे विमान त्याच ठिकाणी सुमारे 15 हजार फूट उंचीवरून उड्डाण करत होते. दोन्ही उड्डाणे जवळ आल्याचे रडारवर दिसून आले.

एटीसीच्या निष्काळजीपणामुळे दोन्ही उड्डाणे इतक्या जवळ आली होती, तरीही नियंत्रकांनी वैमानिकांना सावध केले नाही. नेपाळ नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली. तपासात दोषी आढळल्यानंतर 3 एटीसींना पदावरून हटवण्यात आले.

टॅग्स :nepalair india news