esakal | देशभरातील मालमत्तांचा ‘एअर इंडिया’ करणार लिलाव
sakal

बोलून बातमी शोधा

air india

देशभरातील मालमत्तांचा ‘एअर इंडिया’ करणार लिलाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ‘एअर इंडिया’ने आता तोटा भरून काढण्यासाठी औरंगाबादसह देशभरातील दहा शहरातील मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरातील जालना रस्त्यावरील मोक्याच्या दोन मालमत्तांचा यात समावेश आहे. एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर मालमत्तेच्या ई-लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

‘एअर इंडिया’ गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेली आहे. त्यामुळेच या मालमत्ता लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसटीसी लि. या केंद्र सरकारच्या अखत्यारितील नवरत्न कंपनीच्या माध्यमातून हा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये औरंगाबाद येथील जालना रोडवरील सेवन हिल, या मोक्याच्या जागेवरील पूर्वीचे बुकिंग ऑफिस (२९३७४.७१ स्केअर फुट) आणि स्टाफ क्वार्टर्स (७५९९.३२ स्केअर फुट) या मालमत्तेचा समावेश आहे. ८ आणि ९ जुलै रोजी हि लिलाव प्रक्रिया होणार आहे. बुकिंग ऑफिसकरिता २१.५४ कोटी तर क्वार्टर्सच्या जागेसाठी ४.६४ कोटी इतकी लिलाव किंमत (सुरवातीची किंमत) ठेवली आहे.

हेही वाचा: कौतुकास्पद! नांदेडच्या भाग्यश्रीची पॅरा ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड

देशभरातील मालमत्ता
देशभरातील मालमत्तांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, नाशिक आणि नागपूरचा सामावेश आहे. याशिवाय भूज (गुजरात), नवी दिल्ली, बेंगलुरु (कर्नाटक), कोलकाता (पश्चिम बंगाल), मेंगलुरु (कर्नाटक) आणि तिरुवनंतपुरम (केरळ) या शहरांचा सामावेश आहे. मागील वर्षी देखील लिलावाच्या माध्यमातून पैसा उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने या वेळेस जागेच्या किमती कमी करून लिलाव करण्यात येत आहे. लिलावाची सविस्तर माहिती www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे.

loading image