एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणार आहात? तर...

वृत्तसंस्था
रविवार, 21 जून 2020

पीपीई किटसाठी निविदा मागविणार

- एमिरेट्सकडूनही किट

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एअर इंडिया विशेष काळजी घेण्याच्या तयारीत आहे. एअर इंडियाने प्रवाशांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी 6 लाख पीपीई किट विकत घेणार आहे. त्यामध्ये फेस शिल्ड, मास्क, हँड सॅनिटायझरचाही समावेश असेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले आहेत. त्यानुसार, अनेक व्यवहार आता सुरु झाले आहेत. त्यामध्ये देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू झाली. भारताबाहेर अडकलेल्या हजारो नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाच्या माध्यमातून भारतात आणले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका मोठा आहे. हे सर्व लक्षात घेता आता एअर इंडिया विमान कंपनी आपल्या प्रवाशांसाठी पीपीई किट विकत घेणार आहे. एअर इंडियाप्रमाणेच एमिरेट्स या विमान कंपनीदेखील प्रवाशांना सेफ्टी किट द्यायला सुरुवात केली आहे.

पीपीई किटसाठी निविदा मागविणार

प्रवाशांसाठी 6 लाख पीपीई किट देण्यात येणार असल्याने एअर इंडिया कंपनी या किटसाठी निविदा मागविणार आहे. मात्र, या किटची संख्या त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार कमी किंवा जास्तही होऊ शकते, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. 

Air India

एमिरेट्सकडूनही किट

एअर इंडियाने आपल्या प्रवाशांसाठी पीपीई किटची व्यवस्था केल्याने आता एमिरेट्स ही विमान कंपनीही प्रवाशांना पीपीई किटसह आवश्यक साधनांचा पुरवठा करणार आहे. यामध्ये मास्क, हँड सॅनिटायझर आणि फेस शिल्डचा वापर केला जाणार आहे.

Emirates flights

एअर इंडियाकडून सर्वाधिक मागणी

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअर इंडियाने 6 लाख पीपीई किट खरेदी करण्याचा विचार करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पीपीई किटची मागणी करणारी एअर इंडिया ही पहिली विमान कंपनी ठरली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air India Is Buying 600000 PPE Kits For Passengers