एअर इंडियाच्या विमानाची संरक्षक भिंतीला धडक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

दुर्घटनेनंतर मंत्री नटराजन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या अपघातात विमानाचे नुसकान झाले असून त्याची दुरूस्तीसाठी पाहणी करण्यात येणार आहे. 

चेन्नई : त्रिची विमानतळाच्या संरक्षक भिंतीला एअर इंडियाच्या विमानाने काल रात्री धडक दिली. रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली असून मोठी थोडक्यात दुर्घटना टळली. हे विमान त्रिचीहून दुबईसाठी निघाले असता विमानतळावरच ही घटना घडली. यानंतर विमानाचे मुंबईत लँडिंग करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून विमानातील सर्व 136 प्रवासी सुखरूप आहेत. 

विमानाच्या उड्डाणावेळी त्याची धडक विमानतळाच्या संरक्षक भिंतीला बसली. त्यात विमानाच्या दोन चाकांचे नुकसान झाले, यामुळे पहाटे पाच वाजता विमानाचे तातडीने मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आले. एअर इंडियाने सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावरून पर्यायी विमानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. तांत्रिक कारणांमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जाते. 

या दुर्घटनेनंतर मंत्री नटराजन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या अपघातात विमानाचे नुसकान झाले असून त्याची दुरूस्तीसाठी पाहणी करण्यात येणार आहे. 

Web Title: Air India flight hits with compound wall on trichy airport