एअर इंडियाचे विमान सहा तास धावपट्टीवरच

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

एअर इंडियाचे दिल्ली-कोची- दुबई या मार्गावरील विमान तब्बल सहा तास धावपट्टीवरच थांबले होते. या विमानाची नियोजित वेळ शनिवारी पहाटे पाच वाजून 10 मिनिटांची होती. तांत्रिक कारणामुळे विमानाला विलंब झाल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. मात्र पुरेसे कर्मचारी नसल्याने विमान थांबविल्याचा दावा कंपनीच्या सूत्रांनी केला. 

नवी दिल्ली - एअर इंडियाचे दिल्ली-कोची- दुबई या मार्गावरील विमान तब्बल सहा तास धावपट्टीवरच थांबले होते. या विमानाची नियोजित वेळ शनिवारी पहाटे पाच वाजून 10 मिनिटांची होती. तांत्रिक कारणामुळे विमानाला विलंब झाल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. मात्र पुरेसे कर्मचारी नसल्याने विमान थांबविल्याचा दावा कंपनीच्या सूत्रांनी केला. 

"एआय 933 दिल्ली-कोची- दुबई हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबविण्यात आले. सकाळी 11 वाजता विमानाने उड्डाण केले. या विलंबामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत,' असे ट्विट एअर इंडियाने केले आहे. कर्मचाऱ्यांची समस्या सुटल्यानंतर विमान 11 वाजता मार्गस्थ झाले. या विमानात 170 प्रवासी होते. 

एअर इंडियाचेच दिल्ली-टोकियो विमानालाही काल रात्री सात तास उशीर झाला. विमानातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याने हा उशीर झाल्याचे सांगण्यात आले. या विमानाची वेळ काल रात्री सव्वानऊ वाजता होती. ते सात तासांनंतर म्हणजे पहाटे चार वाजता उडाले. कंपनीच्या अशा अवव्यस्थेबद्दल दोन्ही विमानांच्या प्रवाशांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. 

Web Title: Air India Passengers Protest Over 6-Hour Delay In Take-Off