फक्त महिलांनीच केले 'एअर इंडिया'च्या विमानाचे उड्डाण

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

"एअर इंडिया' या हवाई वाहतूक कंपनीने अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला. 26 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान दहा पेक्षा अधिक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे केवळ महिलांनीच नियंत्रित केली. या विमानांमध्ये पायलटपासून इतर सर्व व्यवस्था केवळ महिला कर्मचाऱ्यांनीच सांभाळल्या.

नवी दिल्ली - "एअर इंडिया' या हवाई वाहतूक कंपनीने अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला. 26 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान दहा पेक्षा अधिक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे केवळ महिलांनीच नियंत्रित केली. या विमानांमध्ये पायलटपासून इतर सर्व व्यवस्था केवळ महिला कर्मचाऱ्यांनीच सांभाळल्या.

हे यश साजरे करण्यासाठी कंपनीच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कामगिरीमध्ये सहभागी झालेल्या महिलांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. केवळ महिलांनीच नियंत्रित केलेल्या विमानाचे यशस्वी उड्डाण करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्‍वनी लोहाणी यांनी या कामगिरीत सहभागी झालेल्या सर्व महिलांचे अभिनंदन केले.

या कामगिरीत सहभागी झालेल्या महिलांना कंपनीच्यावतीने एटीआर-72 या विमानाने दिल्ली ते आग्रा अशी "जॉय राईड' घडविण्यात आली. तर, कंपनीमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असूनही विमान सफर करू न शकलेल्या महिलांनाही कंपनीने विमान सफर घडविली.

Web Title: Air India scripts history with all women operated flights