विमानातील अन्नपदार्थ चोरणारे एअर इंडियाचे चार कर्मचारी निलंबित

air-india
air-india

नवी दिल्ली - एअर इंडिया या राष्ट्रय एअरलाईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या चार कर्मचाऱ्यांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या विमानातून अन्नपदार्थ चोरी केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर आहे. 

एअर इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी यांनी 2017 मध्ये कंपनीला एक पत्र लिहिले होते. त्या पत्रामध्ये त्यांनी विमानाच्या उड्डाणानंतर काही कर्मचारी उरलेले अन्न पदार्थ आणि किराणा खासगी उपयोगासाठी वापरत असल्याचे म्हटले होते. 

असा प्रकारे चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर एअर इंडियाच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

एअर इंडियाला कंपनीकडे याबाबत विचारणा केली असता कंपनीने कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com