मोठी बातमी : भारतातील नागरिकांचे सरासरी आयुष्य 5.2 वर्षांनी वाढणार

टीम ई सकाळ
Thursday, 30 July 2020

- प्रदूषणातील अतिसूक्ष्म धुलीकणाचे प्रमाण डब्ल्यूएचओ मार्गदर्शन तत्त्वाप्रमाणे कमी केल्यास सरासरी आयुष्यात होईल वाढ
- 'एअर क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स'चा (एक्यूएलआय) अहवाल 
- शिकागो विद्यापीठाच्या 'एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट'द्वारे (ईपीआयसी) विकसित एक्यूएलआय प्रणालीच्या आधारावर करण्यात आला अभ्यास

पुणे : कोविड 19 या साथीच्या रोगाने जगभरातील देशांवर प्राणघातक परिणाम केला आहे. दरम्यान अद्याप यासाठी सर्व देशांकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या आजारा पलीकडे वायू प्रदूषणातील अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) हे घटक दररोज जीवाला धोका निर्माण करत आहेत. याबाबतची माहिती नुकतीच एअर क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स'च्या (एक्यूएलआय) अहवालातून समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

शिकागो विद्यापीठाच्या 'एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट'द्वारे (ईपीआयसी) विकसित एक्यूएलआय प्रणालीच्या आधारावर करण्यात आलेल्या या अभ्यासातून पीएम 2.5 बाबतचे विविध पैलू समोर आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वतीने अतिसूक्ष्म धूलिकणाबाबत काही मार्गदर्शन तत्वे जाहीर केले आहेत. त्यानुसार संसर्गजन्य आजार किंवा इतर कोणत्याही कारणांच्या तुलनेत पीएम 2.5चे प्रमाण 10 मायक्रोग्राम प्रति क्यूबिक घन मीटरने वाढल्यास 1.9 वर्षांने आयुष्य कमी होण्याचा धोका वाढतो. तसेच जगातील पाच सर्वात प्रदूषित देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याने डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्वाचे पालन केल्यास भारतातील लोकसंख्येचे सरासरी आयुष्य हे पाच वर्षे दोन महिने, महाराष्ट्राचे सुमारे तीन तर पुण्यातील लोकसंख्येचे सरासरी आयुष्य तीन वर्षे चार महिन्यांपर्यंत वाढू शकेल.

Image

"प्रदूषण हे शरीराला कोरोना पेक्षा अधिक घातक आहे. तसेच या संदर्भात विविध देशांमध्ये संशोधनही करण्यात आले होते. त्यानुसार असे शहर जेथे प्रदूषणाचे किंवा पीएम 2.5 चे प्रमाण जास्त आहे अश्या शहरात कोविडचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यामध्ये इटली, अमेरिका व चीन सारख्या देशात हे आढळून आले. परंतु केवळ पीएम 2.5 बाबत म्हणलं तर याचे प्रमाण डब्ल्यूएचओ च्या मार्गदर्शन तत्त्वा पर्यंत आणणे आव्हानात्मक आहे. मात्र याचे प्रमाण थोडे कमी करण्याचे प्रयत्न नक्कीच केले जाऊ शकतील. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. - डॉ. संदीप साळवी, पिओर फाऊंडेशनचे संचालक व छातीरोग तज्ज्ञ 

Image

डब्ल्यूएचओ मार्गदर्शन तत्त्वानुसार प्रदूषणात कायमची घट झाल्यावर
- जागतिक स्तरावर सरासरी आयुष्य हे 72 पासून 74 वर्षांपर्यंत वाढेल 
- एकूणच, जगाची लोकसंख्या 14.3 अब्ज वर्षे आयुष्य जगू शकेल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air pollution shortened average Indian life expectancy by 5.2 yrs