दिल्लीतील हवेचा दर्जा खालावलेलाच 

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

मागील चार दिवसांपासून दिल्लीतील हवेचा दर्जा खालावलेलाच असून भविष्यामध्ये देखील ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्‍यता आहे. हवामान खात्याने मात्र येत्या काळामध्ये जोराचे वारे वाहू लागल्यानंतर प्रदूषण कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : मागील चार दिवसांपासून दिल्लीतील हवेचा दर्जा खालावलेलाच असून भविष्यामध्ये देखील ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्‍यता आहे. हवामान खात्याने मात्र येत्या काळामध्ये जोराचे वारे वाहू लागल्यानंतर प्रदूषण कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

दिल्ली एनसीआर परिसरामध्ये "पीएम-10' या हानिकारक कणांची पातळी 745 वर पोचली असून दिल्लीमध्ये ती 801 एवढी आहे. हवेतील हानिकारक कणांची पातळी वाढल्याने नागरिकांमधील श्‍वसनाचे विकारदेखील आणखी बळावू शकतात. 
 

Web Title: The air quality in Delhi has very bad