हवाई वाहतूक सेवेसमोर देखील मोठे आव्हान; कोणते ते वाचा

Plane
Plane

नवी दिल्ली - कृषीक्षेत्राला जबरदस्त तडाखा देणाऱ्या टोळधाडीने आता हवाई वाहतूक सेवेसमोर देखील मोठे आव्हान निर्माण केले आहे. प्रत्यक्ष विमानांची उड्डाणे आणि ती विमानतळांवर उतरविताना अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो असा इशारा नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिला आहे. मागील तीन दशकांतील ही  सर्वात मोठी टोळधाड असून याचा मोठा फटका मध्य आणि पश्चिम भारतातील शेतीला बसला आहे. विमान वाहतूक संचालयाने या अनुषंगाने एक परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये विविध सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.       

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टोळ हे वातावरणाच्या खालच्या भागात असल्याने प्रत्यक्ष विमानांचे उड्डाण आणि ते विमातळावर उतरताना यामध्ये अडथळा निर्माण होऊन अपघात होऊ शकतो. अचानक मोठ्या संख्येने टोळ आले तर याचा विपरित परिणाम विमानाच्या अन्य यांत्रिक उपकरणांवर होऊ शकतो, यामध्ये तांत्रिक अडथळे निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावते. एखादे विमान टोळीच्या झुंडीतून गेल्यास त्याचे सेन्सर आणि अन्य तांत्रिक उपकरणांचे मोठे नुकसान होऊ शकते अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. टोळधाडीचा आकार लहान असलातरीसुद्धा त्याचा विमानाला दिशा देणाऱ्या विंडशिल्डवर परिणाम होऊ शकतो. 

वायपरच्या माध्यमातून हे टोळ दूर करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामुळे घाण होऊ शकते. टोळधाड मोठी असेल तर वैमानिकाला विमानतळ  दिसणे देखील अवघड होऊन बसते असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टोळधाड दिसत असेल तर उड्डाण करूच नका अशा स्पष्ट सूचना वैमानिकांना देण्यात आल्या आहेत.  रात्रीच्या वेळी टोळधाडीचा धोका नसतो त्यामुळे त्या काळात उड्डाण केले जावे असेही सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com