विमानप्रवास महागणार; हवाई वाहतुकीवर जादा कर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - प्रादेशिक वाहतुकीला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने हवाई वाहतुकीच्या दरात वाढ केली आहे. या निर्णयामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचा प्रत्येक तिकिटावरील खर्च 60 रुपयांनी वाढणार आहे. 

प्रादेशिक हवाई वाहतूक जोडणी योजनेला निधी उपलब्ध करण्यासाठी प्रमुख हवाई मार्गांवरील विमानांवर 8500 रुपयांपर्यंत अतिरिक्त कर आकारण्यात येणार आहे. 

सरकारने 1000 किलोमीटरपर्यंतच्या प्रादेशिक प्रवासासाठी विमान कंपन्यांवर 7500 रुपयांचा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तर 1500 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा प्रवास करणाऱ्या विमानांसाठी 8500 रुपये कर आकारण्यात येणार आहे. या निर्णयाची माहिती नागरी विमान वाहतूक विभागाच्या सचिवांनी दिली. 
 
Web Title: air travel to be costlier