रिक्षापेक्षा विमान प्रवास अधिक स्वस्त : सिन्हा 

Air travel is more affordable than Rickshaw says Sinha
Air travel is more affordable than Rickshaw says Sinha

नवी दिल्ली : दूरच्या प्रवासासाठी प्रतिकिलोमीटर दराचा विचार केला तर, ऑटोरिक्षाच्या तुलनेत विमान प्रवास अधिक स्वस्त असल्याचा दावा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज केला. 

गोरखपूर विमानतळावरील नवीन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सिन्हा म्हणाले, "आजघडीला विमान प्रवास रिक्षापेक्षा स्वस्त आहे, असे म्हटल्यानंतर हे कसे शक्‍य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जेव्हा दोन व्यक्ती रिक्षाने प्रवास करतात. तेव्हा त्यांना प्रतिकिलोमीटरसाठी 10 रुपये आकारले जातात. याचा अर्थ असा की, त्यांना प्रत्येकी 5 रुपये प्रतिकिलोमीटर दर पडतो. या पद्धतीने विमान प्रवासाचे म्हणाल तर, तुम्हाला प्रतिकिलोमिटरसाठी केवळ 4 रुपये आकारले जातात.'' 

कमी अंतरासाठीही तुम्ही विमानाने प्रवास करावा, असे माझे म्हणणे नसून, वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांच्या तुलनेत विमान प्रवास निश्‍चित स्वस्त आहे, हेच मला सांगायचे होते, असेही सिन्हा यांनी या वेळी स्पष्ट केले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com