विमानांचे "टेक ऑफ'; वाहतुकीचा खोळंबा

यूएनआय
बुधवार, 14 डिसेंबर 2016

चेन्नईतील स्थिती पूर्वपदावर; सरकारकडून मदत जाहीर

चेन्नई : "वरदा' वादळाचा जबर तडाखा बसलेल्या चेन्नईमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून, या वादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या दहावर पोचली आहे. पुढील दहा तासांमध्ये या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात असल्याने चेन्नईकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. या वादळामुळे विस्कळित झालेली चेन्नईमधील विमानसेवा आज पूर्ववत सुरू झाली.

सोमवारच्या वादळामुळे चेन्नईची चांगलीत वाताहत झाली, आज रस्त्यांवर सर्वत्र झाडे, विजेचे खांब आणि होर्डिंग्जचा अक्षरश: खच पडला होता, यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

स्थानिकांना तीव्र दूधटंचाईला सामोरे जावे लागले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या वादळामुळे दहा हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. चेन्नई, कांचीपुरम आणि तिरूवल्लूर येथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. या वादळात जखमी झालेल्यांसाठी मोबाईल मेडिकल कॅम्प सुरू करण्यात आले असून, चेन्नई आणि ओमंदूरमधील रुग्णालयांनीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याअन्वये सुरू करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅन शहरातील नागरिकांना मोफत औषधांचा पुरवठा करतील.
 
रेल्वे वाहतूक पूर्ववत
या वादळामुळे ठप्प झालेली राज्याच्या काही भागांतील रेल्वेसेवा पुन्हा सुरळीत झाली असून, रस्ते वाहतुकीचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे. झाडे उन्मळून पडली असताना अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विजेचे खांब कोसळल्याने विद्युतपुरवठा ठप्प झाला आहे.
 
Web Title: Aircraft "take-off", the detention of transport