अलिशान मोटारींच्या चोरीसाठी विमान प्रवास

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मौजमजेसाठी मोटारींची चोरी केल्याच्या अनेक घटना वाचण्यात येतात, पण दिल्ली पोलिसांनी अशा "हायप्रोफाईल' चोराला नुकतीच अटक केली आहे, ज्याने पाच वर्षांत 500 पेक्षा जास्त अलिशान मोटारी लंपास केल्या आहेत. विशेष म्हणजे मोटारी चोरण्यासीाठी हा चोर हैदराबादमधून नवी दिल्लीत येत होता, तेही विमानाने. मोटारचोरीनंतर तो विमानानेच हैदराबादला परतत असे. 

नवी दिल्ली-  मौजमजेसाठी मोटारींची चोरी केल्याच्या अनेक घटना वाचण्यात येतात, पण दिल्ली पोलिसांनी अशा "हायप्रोफाईल' चोराला नुकतीच अटक केली आहे, ज्याने पाच वर्षांत 500 पेक्षा जास्त अलिशान मोटारी लंपास केल्या आहेत. विशेष म्हणजे मोटारी चोरण्यासीाठी हा चोर हैदराबादमधून नवी दिल्लीत येत होता, तेही विमानाने. मोटारचोरीनंतर तो विमानानेच हैदराबादला परतत असे. 

या चलाख चोराचे नाव सफरुद्दीन असे असून, त्याला पकडून देण्यासाठी पोलिसांनी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. सफरुद्दीनची स्वतःची टोळी असून, मोटार चोरीमध्ये त्याचे साथीदारही त्याला मदत करीत असे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी केल्यानंतर सफरुद्दीन उत्तर दिल्लीमधील नंदनगरमध्ये काही दिवस राहत होता. पोलिसांना चकवून तो साथीदारांसह विमानाने हैदराबादला जात असे. त्यानंतर संधी मिळताच तो पुन्हा दिल्लीला येऊन आलिशान मोटारी चोरत असे. विमान प्रवासात सफरुद्दीन, त्याचा मदतनीस मोहमंद शरीक व अन्य साथीदारांची वेशभूषा एखाद्या उद्योजकांप्रमाणे उंची असे. 

...असा पकडला गेला सफरुद्दीन 
दिल्लीत 3 ऑगस्ट रोजी नेहमीची तपासणी सुरू असताना पोलिस निरीक्षक नीरज चौधरी आणि पोलिस उपनिरीक्षक कुलदीप यांनी गगन चित्रपगृहाजवळ एका मोटारीला थांबविले. चौकशीत चालकाचे नाव सफरुद्दीन असल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान, तो पळून गेल्याने पोलिसांनी पाठलाग करीत प्रगती मैदानावर त्याला पकडले, अशी माहिती पोलिस उपायुक्त राजेश देव यांनी दिली. 

दर वर्षी 100 मोटारी चोरण्याचे उद्दिष्ट 
चौकशीत सफरुद्दीनने पोलिसांना सांगितले, की टोळीतील साथीदारांसह दर वर्षी 100 आलिशान मोटारी चोरण्याचे त्याचे उद्दिष्ट होते. ज्या मोटाराची चोरी करायची त्याला कोड दिला जात असे. उभी असलेली मोटार चोरण्यासाठी सॉफ्टवेअर, जीपीएस यंत्रणा व गाडीचे लॉक तोडण्यासाठी लॅपटॉप अत्याधुनिक यंत्र व साधने वापरली जात असत. त्यानंतर काही वेळांतच ते गाडी पळवून नेत. उत्तर जिल्हा विशेष कर्मचारी पथकाने दिलेल्या माहितीनुसार सफरुद्दीनच्या टोळीकडे इलेक्‍ट्रिक कंट्रो मोड्युल (इएमसी) स्कॅनर, मोटार उघडण्याच्या यंत्रासह कुलूप व 64 किल्ल्या सापडल्या. ब्लूट्रयूथ स्कॅनरच्या मदतीने "इसीएम'ला निष्क्रिय करीत मोटार चोरी करीत असे. चोरांच्या जबानीनंतर मेरठ व मुरादनगरमधून चोरलेल्या दहा महागड्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. 

Web Title: Aircraft travel to theft of vehicles